सकाळ अंधारलेली ..
वीजमहामंडळाच्या कृपेने आणि सद्या चालू असलेल्या,कधीही होणार्या भारनियमनामुळे सकाळी सकाळीच चाळीतली विज गेली. कसा बसा डोळे चोळत उठलो. तस डोळे चोळण्यात काही अर्थ नव्हताच म्हणा कारण पावसाळ्यात सकाळी ६ म्हणजे पाहिजे तसा उजेड नाही मग डोळे उघडुनही काही दिसणार डोम्बल.. कामाला वेळेवर निघायचे होते म्हणुन पटकन आवरत घेतल.
अंधारातच अंघोळ करण्याची मजा काय येते तुम्हाला काय सांगू. एकदा अंगाच्या साबणा ऐवजी कपडे धुण्याच्या साबणाने अंघोळ करून बघा म्हणजे कळेल.अंघोळ करून थोडा चहा घेतला आणि पूजेच्या तयारीला लागलो. देव्हार्यातल्या फोटोंना पुसून अंदाजानेच टीळे लावले, हार घातले आणि पूजा संपवली. अंधारातच थोडा नाश्ता केला आणि निघण्याच्या तयारीला लागलो. पटपट कपडे चढवले, केस व्यवस्थित केले आणि निघणार ईतक्यात वीज आली .
पाहिले तर काय शर्टची बटणे वर खाली झालेली. पटकन ती व्यवस्थित केली. घाईगडबडीत देवाला नमस्कार करायला विसरलो होतो. देव्हार्याजवळ जाउन हात जोडले आणि देवाकडे पाह्तच बसलो. कपाळाचा टिळा देवाच्या पोटाला पाहून स्वताच्या कपाळाला हात लावला. देवाच्या चेहर्याकडे पाहिले तर देव फोटोमध्ये हलकेच हसत होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 : प्रतिसाद:
khup chan.. mastach.
Post a Comment